Home Blog नगर-मनमाड महामार्ग :अवजड वाहतूक बंद करा

नगर-मनमाड महामार्ग :अवजड वाहतूक बंद करा

46
0

राहुरी – जो पर्यंत नगर मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी कारण अवजड वाहतुकीमुळे महामार्गावरील बुजवलेले खड्डे पुन्हा तयार होतात.झालेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत.कोल्हार ते नगर दरम्यान खड्ड्यांमुळे शेकडो तरुणांचे व प्रवाशांचे प्राण गेलेले आहेत.त्यामुळे नगर मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूचा एक रस्ता दुरुस्त करावा व जो पर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी.मागणी मान्य न झाल्यास दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी नगर मनमाड महामार्ग जोडणाऱ्या राहुरी येथील मुळा नदीवरील पुलावर बेमुदत रस्ता बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

राहुरी कारखाना येथे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी सौ.प्रभावती घोगरे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,नगराध्यक्ष सत्यजित कदम,धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे,दिपक त्रिभुवन,मनसे नेते नितीन कल्हापुरे,कृती समितीचे वसंत कदम,देवेंद्र लांबे,सुनिल विश्वासराव, अनिल येवले, संदीप कोठुळे उपस्थित होते.कृती समितीचे सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ नगर मनमाड महामार्गावरून जात असताना रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी राहुरी कारखाना येथे जिल्हाधिकारी यांना थांबवत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत पत्र दिले. तसेच महामार्गावरील आतापर्यंत झालेल्या अपघातांमुळे शेकडो कुटुंब उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे.खा.निलेश लंके यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी फोनवर संपर्क साधत बैठकीला जमलेल्या सदस्यांना सांगितेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here