
सोनई – येथे संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी त 9 ऑगस्ट रोजी विश्वलक्ष्मी मंगलकार्यालय येथे सोनई शाखेचे विठ्ठल महाराज खाडे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या संत निरंकारी मंडळाने दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य सुनील गडाख, मुळा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब निमसे, डॉ.बाबासाहेब शिरसाठ , पत्रकार विनायक दरंदले ,प्रकाश शेटे ,डॉ.रामनाथ बडे, एस. बी. शेटे,शिवाशेठ बाफना, ब्रह्मकुमारी उषा दिदी, पसायदान आनंदवनचे संजय गर्जे,उदय पालवे,किशोर घावटे,प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे, बाळासाहेब ढाले, मारुती मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थितीत होते.
जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर टीमच्या माध्यमातून एकूण 124 रक्त बॉटल्सचे संकलन करण्यात आले.
या शिबीरासाठी विनायक होडशीळ, अरुण यादव, अशोक साळुंके,सुहास वैरागर, बाळासाहेब शेटे,निरंकारी सेवादार व सत्संगच्या महात्मानी यांनी पुढाकार घेतला. माका, कुकाणा, देडगाव, शेवगाव परिसरातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.











