
सोनई : मानवता एकता दिवस निमित्त संत निरंकारी द्वारा रक्त दान शिबिराचे आज रविवार 4 ऑगस्ट रोजी सोनईतील विश्वलक्ष्मी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अर्थ व पशूसंवर्धन सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते रक्त दान शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.प्रार्थनेच्या माध्यमातून मान्यवरांचा स्वागत सोहळा पार पडला.प्रास्ताविक विठ्ठलजी खाडे यांनी प्रास्ताविक केले.संत निरंकारी द्वारा वर्षभरातील विविध कार्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
सकाळपासून रक्तदान करण्यासाठी अनेकांनी नाव नोंदणी केली.












