ब्राम्हणी : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जी. डी उगले,ज्येष्ठ शिक्षक नवनाथ महापुडे यांची मुख्याध्यापकपदी तर नंदकुमार हापसे सर यांचे पर्यवेक्षकपदी प्रमोशन झाले.शुक्रवारी आदर्शचे प्राचार्य नानासाहेब जाधव व सहकारी शिक्षकांनी बढतीबद्दल त्यांचा सन्मान केला.
मूळ खडांबे गावचे जी. डी उगले आदर्शमध्ये अनेक वर्षापासून (गणित-भूमिती विषय) सेवेत आहे. शिक्षक पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक या पदावर त्यांनी काम केले.आता त्यांना बढती मिळाली असून मुसळवाडी येथील स्व.मथुराबाई धुमाळ विद्यालयात ते मुख्याध्यापक म्हणून रुजू होणार आहेत.
मूळ वांबोरीतील नवनाथ महापुडे (मराठी विषय) यांनी आदर्श माध्यमिक विद्यालयासह विविध शाळेत अध्यापनाचे काम केले. सेवाजेष्ठतेनुसार त्यांना मुख्याध्यापक पदी प्रमोशन मिळाले. मांजरी येथील चंद्रगिरी माध्यमिक विद्यालयात ते आता रुजू होतील.तर, आदर्श विद्यालयातील मूळ ब्राम्हणी गावचे असलेले नंदकुमार बाळकृष्ण हापसे (मराठी विषय ) यांचे पर्यवेक्षक म्हणून प्रमोशन झाले. संत तुकाराम विद्यालय बारागाव नांदूर येथे सेवेत दाखल होतील.
आदर्शमध्ये डी.वाय काळे (इंग्रजी विषय) बारागावनांदुर येथून उप मुख्याध्यापक म्हणून बदलून आले आहेत.आता सदर शिक्षकांच्या रिक्त जागेवर आदर्श विद्यालयाला मराठी,गणित विषयाच्या शिक्षकांची प्रतीक्षा आहे.