
गणराज्य न्यूज राहुरी : मी शिवाजीराव कर्डीले आहे. या भूमिकेत सर्वांनी सामोरे जावून राहुरी नगर परिषदेवर भगवा फडकवायचा असा निर्धार करूया असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते.
आमदार नसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगून राहुरीचे सर्व अधिकार आम्ही कर्डिले यांना दिले होते.याची आठवण पालकमंत्री विखे यांनी करून दिली.
न भूतो न भविष्य असं काम व कार्य स्वर्गीय कर्डिले यांनी केले. अक्षयच्या रुपाने राहिलेले स्वप्न पूर्ण करायचं आहे.
राहुरी नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा..हिच खरी स्वर्गीय कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल.. अशी भावनिक साद माजी खासदार डॉ.सुजय विखे कार्यकर्त्यांना घातली. स्वर्गीय कर्डिले यांचे उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे परिवार कायम सोबत आहे.
राहुरी नगरपरिषद निवडणूकीसाठी समिती नेमली आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी समिती सदस्यांकडे इच्छा व्यक्त करा.एकनिष्ठ लोकांचा विचार केला जाईल. कर्डिले यांना मानणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल.असे डॉ.विखे पाटील म्हणाले.
लोक जोडणे ते टिकविणे हे कौशल्य कर्डिले यांच्यामध्ये होते. आमदार असो नसो प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होते.पूर्वीच्या मतदारसंघात लोक आअसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. मनोगत व्यक्त करताना अनेकांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सत्यजित कदम, विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, सर्जेराव घाडगे, हभप बांगर ताई, शिवाजी सागर आदीसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर सुभाष पाटील, युवानेते अक्षय कर्डिले, नामदेव ढोकणे, बाळकृष्ण बानकर,सुरसिंग पवार, उत्तमराव म्हसे, आर आर तनपूरे, श्यामराव निमसे, गणेश खैरे, संदिप कर्डिले, प्रविण लोखंडे, कांतिलाल जगधने,अमोल भनगडे, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












