गणेश हापसे,गणराज्य न्यूज ब्राम्हणी : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त ब्राम्हणी-चेडगाव रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिरासमोर मंगळवार 20 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.
मंगळवार 20 ऑगस्ट ते मंगळवार 27 ऑगस्ट दरम्यान सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी 7 ते 9 हरी किर्तन होणार आहे. यामध्ये ह.भ.प किशोर महाराज गडाख, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज हजारे, ह.भ.प विष्णू महाराज पिठोरे ह.भ.प राम महाराज खरवंडीकर ह.भ.प रमेश महाराज जाधव,ह.भ.प ऋतुजाताई दळवी, ह.भ.प वर्षाताई काळे आदींची कीर्तने होणार आहेत.

मंगळवार 27 ऑगस्ट रोजी ह.भ.प अर्चनाताई जाधव यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.तरी आपण सर्वांनी दररोज उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात येत आहे.













