गणराज्य न्यूज – गणेश हापसे राहुरी –
पुढाऱ्यांनी राहुरी मतदारसंघातील राजकारण करत संस्था बंद पाडल्या ऊस उत्पादक व शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला कारखाना सुरू होऊ शकतो यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही काम धेनू चालू करावी लागेल मतदारसंघांमध्ये अपेक्षित विकासकामे झालेली नाही.
यासाठी विधानसभा महत्वाची आहे. राहुरी विधानसभा निवडणूक तुमच्यासारख्या सहकाऱ्यांनी हातात घेतली तर नक्कीच लढविणार असल्याचे रामचंद्र ऊर्फ राजुभाऊ शेटे यांनी केली.
रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान राहुरी येथील गाडगे महाराज आश्रम शाळा येथे यासंदर्भात नुकताच सहकाऱ्यांचा विचारविनिमय मेळावा झाला. यावेळी शेटे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते गोविंद म्हसे होते. शेटे म्हणाले की, राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
ते प्रश्न सोडविण्यासाठी व जनतेची मागणी असेल तर विधानसभा लढवणार आहे.
आपल्याला कोणावर टीकाटिपणी करायची नाही आपल्याला फक्त विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुळा प्रवारा संस्था गेली कारखाना बंद पडला कारखान्याची सलग्न असलेल्या संस्थेमध्ये किती भ्रष्टाचार होतो. याची माहिती घेणे गरजेचे आहे.
तसेच नगर मनमाड रस्त्याची दुरावस्थेमुळे हजारो नागरिकांचे बळी गेले.
यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले यासह राहुरीच्या विद्यापीठातही मोठा भ्रष्टाचार सुरू आहे.
तर हा कार्यकर्त्यांचा मेळावा नसून सहकाऱ्यांशी विचार विनिमय बैठक असल्याचे शेटे म्हणाले.
या बैठकीसाठी बापूसाहेब धसाळ, सतीश बोरुडे, अविनाश पेरणे, संजय संसारे, नितीन काळे, कैलास शिरसाठ, पोपट पोटे, शरद डुक्रे, सतीश पवार, उमेश खिलारी, सचिन काळे, सुनील भुजाडी, साईनाथ कदम, सुरेश आजबे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवाजी जाधव, विठ्ठल धसाळ, संतोष धसाळ, संदीप आढाव, राहुल तमनर, मनोज खुळे, संपत जाधव, दत्तात्रय आढाव, सुभाष तारडे, पोपट पोटे, किशोर दोंड, केशव म्हसे, कचरू तागड, राजेंद्र नरोडे, संदीप वाघमारे, संदीप थोपटे, राधेश्याम जाधव, धनु घुगरकर, विजय उंडे, नितीन शेटे, जालिंदर कानडे, बाळासाहेब वाघ, गणेश गोपाळे, नितीन कदम, सौरभ शिरसाठ, कुलदीप पवार, अक्षय गोपाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केले. आप्पासाहेब ढोकणे यांनी आभार मानले.