गणराज्य न्यूज- राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्वराज कृषी मित्र शेतकरी उत्पादक कंपनीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट दिली. यावेळी डॉ. आशिया यांनी कंपनीची माहिती जाणून घेतली.
अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे होते. यावेळी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, माजी संचालक के. एम. पानसरे, साहेबराव दुशिंग, आदिनाथ महाराज दुशिंग, सरपंच सुरेश साबळे आदी उपस्थित होते.
माहिती देताना कंपनीचे संचालक महेश पानसरे, संदीप अडसुरे, प्रा. किशोर मोरे, भास्कर को-हाळे यांनी सांगितले की कंपनीमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीहितार्थ सेवा पुरवल्या जातात. या कंपनीचे ३१३ सभासद आहेत. ही कंपनी परिसरातील शेतकऱ्यांचा
सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्यात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांसाठी कंपनीमार्फत धान्य प्रतवारी प्रक्रिया युनिट सुरू केले आहे तसेच ड्रोनद्वारे अत्याधुनिक पध्दतीने शेतपिकांवर फवारणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच भविष्यात कंपनीमार्फत शेतकऱ्यांना आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी डॉ. आशिया यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
सदर भेटीवेळी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, उपकृषी अधिकारी आशुतोष धुमणे, मंडळ अधिकारी रामहरी मिसाळ, तलाठी श्री. जाधव, ग्रामसेवक मुरलीधर रगड, माजी उपसरपंच आदिनाथ पटारे कृषी सहायक, गोरक्षनाथ देव्हारे, श्री बनकर, कारभारी कदम, डॉ. संजय ढोकणे, डॉ. बाचकर, राजू दुशिंग, अनिल ढोकणे, प्रांजल अडसुरे, अरुण काळे, आण्णासाहेब दुशिंग, चांगदेव ढोकणे, सुनील दुशिंग, दत्तात्रय ढोकणे, राजेंद्र दुशिंग, बाळासाहेब ढोकणे, साहेबराव गायकवाड तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले.













