Home महाराष्ट्र ब्राम्हणीत चोरट्यांची दहशत!

ब्राम्हणीत चोरट्यांची दहशत!

2
0
filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; hdrForward: 4; highlight: 1; motionR: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0000,0.0000; brp_del_sen: 0.0000,0.0000; delta:1; bokeh:1; ispap:1; papproctime: 2026:04:11 09:14:40; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.37564832, 0.20653026);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत आहे.गत आठवड्यात घरातून सोने चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा रात्री चोरट्यांनी दुकानात दरोडा टाकून पैसे पळविल्याची घटना घडल्याने ब्राम्हणीत चोरट्यांची दहशत पसरली आहे.

सुयश कलेक्शन व महेंद्र प्रोव्हीजन या कापड व किराणा दुकानातून शुक्रवारी मध्यरात्री २ ते ३ वाजे दरम्यान चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करत काउंटर मधील ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
ब्राह्मणी बस स्टँड पासून जवळ व कायम रहदारीचा राहुरी सोनई रस्त्याच्या लगत सुयश कलेक्शन व महेंद्र प्रोव्हीजन दालनाची भव्य इमारत आहे.एवढे मोठे उंच असलेले शटर उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

filter: 

महेंद्र संकलेचा रात्री १० वाजता दुकान बंद करून केले.रात्री चोरट्याने चोरी केली. रात्री रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला नाही हे विशेष.सकाळी ७ वाजता कामानिमित्त गावात जाणाऱ्या काही व्यक्तींच्या दुकानाचे शटर वाकडे झाल्याचे दिसले.लागलीच त्यांनी दुकान मालकाला सांगितले.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी गर्दी केली. पोलीस येईपर्यंत आत कोणीच प्रवेश केला नाही. सदर घटनेची माहिती पीआय संजय ठेंग यांना कळविली. नगरहून श्वान पथक व फिंगरप्रिंट पथक पाचारण करण्यात आले. पथकाचे पोलीस कर्मचारी डाके व गायकवाड तपासणी केली. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पीएसआय समाधान फडोल, पोलीस कॉन्स्टेबल अशोक झिने,चांद पठाण आदींनी घटनास्थळी भेट देत सविस्तर माहिती घेत गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही केली.

filter: ;

महेंद्र अशोक संकलेचा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने करत आहेत.

filter: 

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी सदर चोरट्यांचा शोध घ्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here