राहुरी : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहिरातीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणार राज्य सरकारला सत्तेतून पायउतार केले जाणार आहे.असा दावा करत महाविकास आघाडी शासनाची सत्ता येताच शेतकर्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवू असे आश्वासन आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
राहुरी बसस्थानक येथे ५ कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून इमारत बांधकामाचा शुभारंभ आ. तनपुरे यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अॅड. कचरू चितळकर हे होते. इमारत बांधकाम शुभारंभप्रसंगी ताराचंद तनपुरे, आसाराम शेजूळ, अॅड. चितळकर, यशवंत हारदे, विष्णू तारडे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले.
आ. तनपुरे म्हणाले की, बसस्थानकाचा प्रश्न महाविकास आघाडी शासन काळातच सोडविला होता. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी दौर्यातच निधीचा शब्द दिल्यानंतर १७ कोटी रुपये मंजूर केले होते. कोरोना, बस चालक-वाहक संपानंतर महाविकास आघाडी शासन पायउतार झाल्याने अडचण आली. परंतू विरोधी गटात असतानाही पाठपुरावा सुरूच ठेवला.
मंत्रालयात राज्य परिवहन विभागाचे अधिकारी विद्या भिलारकर व व्यवस्थापकीय अधिकार्यांची वेळोवेळी भेट घेतल्यानंतर १७ कोटी पैकी ५ कोटी मिळाले. इमारत बांधणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येताच बीओटी तत्वावर बसस्थानक परिसरात व्यापारी संकूल उभारत सुशोभिकरण करून घेऊ. जिल्ह्यात आदर्शवत ठरेल अशी बस इमारत बांधणी होईल असे आश्वासन आ. तनपुरे यांनी दिले.
याप्रसंगी आ. तनपुरे यांनी शासनाने शेतकर्यांचे मागिल अनुदान थकविले आहे. नविन नियमानुसार पीक विमा कंपनीच्या नफ्या तोट्यात शासन सहभागी राहणार असताना पीक विमा कंपनीचे २ हजार कोटी थकविल्याने शेतकर्यांना अजून खरीप २०२३ ची नुकसान भरपाई मिळालेली नाही. सौर कृषी योजना महाविकास आघाडी शासन कालखंडात सुरू केल्याने राहुरी परिसरात शेतकर्यांना दिवसा वीज मिळाल्याचे समाधान आहे. मागिल योजनांचे अनुदान थकीत करून नव्या लाडक्या योजनांचा गवगवा करणार्या युती शासनाला जनता जागा दाखविणारच असल्याचा दावा आ. तनपुरे यांनी केला.
याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले. माजी उपसभापती रविंद्र आढाव, जि.प.माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब जठार यांनी मनोगत व्यक्त केले. परिवहन विभागाच्या उपअभियंता सायली वाजे, आगार व्यवस्थापक खोत, बसस्थानक प्रमुख विजय वाघ, सहाय्यक अरुण गुलदगड यांनी आ. तनपुरे यांचा सन्मान केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष भारत तारडे, युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, सुनिल अडसुरे, आदिनाथ तनपुरे, सुरेशराव निमसे, श्रीराम गाडे, वसंत गाडे, इस्माईल सय्यद, सलीम शेख, मारूती हारदे, राजेंद्र गाडे, किशोर दोंड, चंद्रकांत पानसंबळ, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, आप्पा जाधव, बाळासाहेब लटके, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, सुभाष डुक्रे, अनिल कासार, दत्तात्रय येवले, गोरक्षनाथ पवार, दत्तात्रय शेळके, आण्णासाहेब सोडनर, नारायण जाधव, राहुल म्हसे, नितीन बाफना, अनिल इंगळे, भाऊसाहेब खेवरे, सचिन भिंगारदे, विलास तरवडे, बापुसाहेब गागरे, इंद्रभान पेरणे, गोरक्षनाथ दुशिंग, विजय माळवदे, महेश पानसरे, गजानन सातभाई, सत्तार शेख, साहेबराव दुशिंग, मंजाबापू चोपडे, गणेश हारदे, गहिनीनाथ पेरणे, डॉ. रविंद्र गागरे, रघुनाथ मुसमाडे, यशवंत हारदे आदींची उपस्थिती होती.