गणेश हापसे: गणराज्य न्यूज टीम ब्राम्हणी : अल्पावधीतच जिल्ह्यात, राज्यभर व देशातील निवडक यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि ब्राम्हणी या तिन्ही कार्यालयात इच्छुकांना जॉबची संधी उपलब्ध झाली असून विविध पदासाठी सुमारे 37 जणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
त्यासाठी अर्ज करण्याचा आज शुक्रवार 10 जानेवारी शेवटचा दिवस असून इच्छुकांनी नोकरीसाठी अर्ज करावेत असे आवाहन ग्रीनअप उद्योग समूहाने केले आहे.
खालील पदांसाठी ही भरती होणार असून चांगला पगार, सर्व कामगार सुविधा, आवश्यक भत्ता, विमा याद्वारे मिळणार आहे.
प्रोजेक्ट मॅनेजर 3 जागा,
सिनियर अकाऊंटंट 1 जागा,
मार्केटिंग मॅनेजर 2 जागा,
डेटा एन्ट्री ऑपरेटर 2 जागा,
मार्केटिंग एक्सयुकेटीव्ह 10 जागा,
एचआर/पीआर मॅनेजर 1 जागा,
कृषी सहाय्यक 5 जागा,
वॉचमन 3 जागा,
10 वी उत्तीर्ण महिला 10 जागा
अशी कामगारांची भरती होणार असून 12 जानेवारी 2025 रोजी मुलाखती होणार आहेत. त्यापूर्वी इच्छुकांनी 9579973399 या मो क्रमांकावर आपला बायोडेटा व स्वलिखित अर्ज पाठवण्याचे आवाहन ग्रीनअपचे कार्यकारी संचालक,एमडी सचिन ठूबे यांच्याकडून करण्यात आले आहे.

















