ब्राम्हणी : चेडगाव रस्त्यालगत चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिरासमोर संगीत तुलसीदास रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.कथा प्रवक्ते हभप रावसाहेब महाराज गायकवाड यांच्या वाणीतून रविवार 16 मार्च ते रविवार 23 मार्च दरम्यान दररोज सायंकाळी 7 ते 9 कथा होणार आहे.
रविवार 23 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 9 यावेळेत शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी भाविक भक्तांनी तुलसीदास रामायण कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन वीर छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात येत आहे.