ब्राम्हणी – श्री क्षेत्र कौठेकमळेश्वर ते श्री क्षेत्र मढी पद यात्रा सोहळ्याचे रविवारी दुपारी ब्राम्हणीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ब्राम्हणी गावचे माजी उपसरपंच कैलास यमाजी पटारे यांनी सपत्नीक पालखी सोहळ्याचे विधिवत पूजन केले.श्री क्षेत्र मढी यात्रेच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कौठेकमळेश्वर येथून पायी पालखी सोहळा येत असतो.दुपारचं भोजन कैलास यमाजी पटारे यांच्या परिवाराकडून दरवर्षी असते.आमटी भाकरी अशी पंगत पार पडली.