गणराज्य न्यूज
राहुरी : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीचा विनयभंग आणि अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीसह त्यांना रूम देणाऱ्या लॉज मालकाला राहुरी पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.
या घटनेतील मुलीची पाच महिन्यांपूर्वी आरोपी यश डौले याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर मुलीशी आरोपीने शनिशिंगणापूर रोडवरील उंबरे गावच्या शिवारातील एका हॉटेल मध्ये गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आणि दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी आरोपीने सदर मुलीवर नगर-मनमाड राज्य महामार्गावरील
नांदगाव शिंगवे शिवारातील लॉजमधील एका रूममध्ये दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.
फिर्यादीवरून मुलीच्या आरोपी यश डौले याच्या विरोधात मारहाण, विनयभंग, पोक्सो तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान पोलिस पथकाने आरोपी यश अनिल डौले तसेच त्यांना लॉजमधील रुम देणारा लॉज मालक अनिकेत विश्वास जाधव, रा. शिंगवे नाईक या दोघांना ताब्यात घेऊन गजाआड केले. या कारवाईमुळे लॉज मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुदाम शिरसाठ, हवालदार सतीश आवारे, पो. ना. कुदळे हे करीत आहे.













