गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पांडुरंग मंगल कार्यालय राहुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्व.शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने कार्यकर्त्यांसह कर्डिले कुटूंबियांना धक्का बसला आहे. यामध्ये स्व शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या बरोबर राहून येणाऱ्या सर्वच निवडणुकांना सामोरे जाऊन त्यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात राज्यमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.अक्षय कर्डिले यावेळी उपस्थित राहणार आहेत. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिले कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारले असून अक्षय कर्डिले यांना आमदार बनविण्याचा निर्धार केला आहे.
त्याचबरोबर नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असुन नामदार राधाकृष्ण विखे पाटील या मेळाव्यात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर राहुरीत भाजप व महायुती कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.













