Home अहमदनगर संतकवी माहिपती महाराज देवस्थानचा फिरता नारळी सप्ताह

संतकवी माहिपती महाराज देवस्थानचा फिरता नारळी सप्ताह

93
0

 

राहुरी फॅक्टरी : येथील क्लब हाऊस प्रांगणात १८ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान श्री संतकवी महीपती महाराज श्रीक्षेत्र ताहाराबाद यांचा फिरता नारळी सप्ताह कमिटीच्या अध्यक्षपदी संजय कदम तर उपाध्यक्षपदी अजिंक्य गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

राहुरी फॅक्टरी येथे संत कवी महिपती देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या सप्ताह काळात दररोज सकाळ व संध्याकाळ नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व सकाळ व संध्याकाळी हजारो भाविकांना महाप्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.सप्ताहासाठी अन्नदान पंगत व संतपूजनाची जबाबदारी अनेक दात्यांनी स्वीकारली आहे. या सप्ताह काळात दररोज १६ गावातील भाविकांकडून भाकरीची पंगत दिली जाणार आहे.

सप्ताह कमिटीच्या कार्यकारणीची यावेळी निवड करण्यात आली अध्यक्षपदी संजय कदम,उपाध्यक्ष अजिंक्य गायकवाड, सचिव सोपान घोरपडे, सहसचिव शंतनू नालकर, खजिनदार वसंत बर्डे, सह खजिनदार धनंजय डोंगरे यांची निवड करण्यात आली.तसेच सप्ताहाच्या योगदानासाठी विविध १६ कमिट्या करण्यात आल्या आहेत.

या बैठकी प्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, राहुरी अर्बनचे प्रशांत काळे,आकाश बेग,बाबा महाराज मोरे,संजय महाराज शेटे, अनिल महाराज टेकूडे,राजेंद्र चव्हाण, कांता कदम,दत्ता गागरे, सोमनाथ कीर्तने, जयेश मुसमाडे,नितीन वाघ, ज्ञानेश्वर मोरे ,किशोर वरघुडे,धनंजय डोंगरे,शिवाजी महाराज शिंदे, प्रा.विलास मुसमाडे, शंतनू नालकर, शिवराम कडू, जालिंदर मुसमाडे, निलेश भगत,जगन्नाथ वरखडे,मंगेश ढुस,बाबासाहेब मुसमाडे,संजय काळे आदिंसह भाविक भक्तगण उपस्थित होते.सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here